यूट्यूबवर किती व्ह्यूज मिळाल्यानंतर कमाई सुरू होते व पैसे आपल्या बँक खात्यात कसे जमा होतात?
सगळयांना युट्युब (YouTube) माहीतच आहे. युट्युब (YouTube) हे असे व्यासपीठ (Platform) आहे ज्या वरून तुम्ही कोणताही विडिओ जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून सर्वा पर्येंत पोहोचूशकता (Share). परंतु काही लोकांना माहित नाही की आपण यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवू शकतो, जरी माहित असले तरी काही संभ्रम आहेत.
त्या मधील एक संभ्रम किंवा सारखा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे यूट्यूबवर किती व्ह्यूज मिळाल्यानंतर किती पैसे मिळतात. पण युट्युब वरून पैसे कमवायला व्ह्यूज चे बंधन नाही तर ती बंधने दुसरीच आहेत . तर ती बंधने पुढील प्रमाणे,
- आपण जेव्हा चॅनल चालू करता व जेव्हा पहिला व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा पासून ३६५ दिवस म्हणजे १ वर्षामध्ये तुमच्या चॅनल मधील व्हिडिओज हे ४००० तास पहिले गेले पाहिजेत.
- व दुसरी अट आहे कि चॅनेला १००० सबस्क्राईब मिळणे गरजेचे आहे


तरच तुमचे युट्युब चॅनेल मॉनीटाईज करण्यासाठी तयार असेल.
आता ४००० तास म्हणजे काय ? :-
- समजा १ वर्षा मध्ये तुम्ही २० व्हिडिओ अपलोड केले, प्रत्येक व्हिडिओ १० मिनिटांची आहे आणि सर्व २० व्हिडिओ मिळून २०० मिनिटे होत आहेत.
- म्हणजे २००/६०= ३.३३ तास
- आता १ वर्षात तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळाले समजा १०,००० व त्या मधील प्रत्येकानी सर्व विडिओ बघितली, म्हणजे प्रत्येकानी ३.३३ तास व्हिडिओस बघितले
- तर १०, ००० लोकांनी तुमची व्हिडिओ पाहून ३३,३३३ तास भरले
- आणि १०,००० पैकी १००० लोकांनी तुम्हाला सबसक्राईब केले म्हणजे आता तुमची दोन्ही अटी पूर्ण झाल्या
आणि जर तसे झाले नाही १ वर्षा मध्ये तर मग तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ टाकलेल्या त्या महिन्याचे तास कमी होतील व पुढचा १ महिना वाढेल असे तो पर्यंत होईल जो पर्यंत ४००० पूर्ण होत नाही,
जेव्हा तुमचे अकाउट च्या सर्व अटी पूर्ण होतात व तुम्ही अड्सेंस चे अकाउंट चालू होते व कमाई चालू होते.
कमाई कशावर अवलंबून असते? :-
- आपल्या चॅनल वर ज्या ऍडव्हर्टाईस येतात त्या किती लोकांनी पहिल्या त्या वर असते.
- अश्या करत करत जेव्हा तुम्ही $१०० कमावता त्या नंतर तुम्हाला पैसे काढता येतात.
- त्या साठी तुम्ही तुमचे बँक अकाउंट गुगल ऍडसेन्स ला जोडावे लागते.
परंतु :-
जेव्हा चॅनेलचे पुनरावलोकन (Review) होते तेव्हा युट्युब काय तपासते.
पुनरावलोकनकर्ते चॅनेलचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करणारी सामग्री तपासतात. पुनरावलोकनकर्ते प्रत्येक व्हिडिओ तपासू शकत नाहीत म्हणून ते कदाचित आपल्या चॅनेलवरील महत्वाचे गोष्टीच्या कडे लक्ष केंद्रित करू शकतातः
- मुख्य थीम (चॅनेल कोणत्या कारणासाठी बनवला आहे)
- सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ
- नवीनतम व्हिडिओ
- पाहण्याच्या वेळेचे सर्वात मोठे प्रमाण (कोणता विडिओ जास्त पहिला गेला आहे )
- विडिओ मेटाडेटा ( विडिओ चे शीर्षक, लघुप्रतिमा (thumbnail), वर्णन (descriptions))
पुनरावलोकनकर्ते मूल्यांकन करू शकणार्या सामग्रीची वरील काही उदाहरणे आहेत.
जर तुम्ही “समुदाय मार्गदर्शक तत्त्वे” (Community Guidelines) पाळली नाहीत तर तुमचे युट्युब चॅनेल ब्लॉक होऊ शकते.
पण या सर्वांसाठी पेशन्स (धीर) असणे गरजेचे मध्येच सोडून दिले तर आपला सर्वच वेळ वाया ..
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/