पॅन कार्ड काय आहे? What is PAN Card in Marathi?

मित्रानो तुम्हाला कधी ना कधी पॅन कार्ड (PAN Card) ची गरज आली असेल तर आज या लेख मध्ये आपण पॅन कार्ड (PAN Card) ची माहिती घेणार आहोत.

पॅन कार्ड (PAN Card) काय आहे, का महत्वाच आहे आणि कसे तयार करावे?

आज आपण पॅन कार्ड (PAN Card) बद्दल माहिती घेणार आहोत. जगात जेवढे पण देश आहेत आणि त्या देशामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्याकडे ओळखपत्र (Identity Card) असणे गरजेचे आहे. कारण त्या ओळकपत्राद्वारेच आपण हे माहिती करू शकतो की तो कोणत्या देशाचा रहिवाशी आहे. आपल्या देशातील लोकांकडे पण खूप प्रकारचे ओळखपत्र आहेत ,जसे आधार कार्ड (Aadhar card), मतदान कार्ड (Election Card), वाहन परवाना (Driving License), इ. याचबरोबर अजून एक ओळख देण्यासाठी आणि याचबरोबर बॅंक च्या कामासाठी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पॅन कार्ड (PAN Card) त्याची माहिती आज आपण बघूया.

पॅन कार्ड काय आहे? What is PAN Card in Marathi?

पॅन कार्ड चे पूर्ण नाव (PERMANENT ACCOUNT NUMBER)  असा आहे.हा एक अद्वितीय ओळखपत्र (Unique Identity Card) आहे. आणि हे कोणत्या पण प्रकारच्या आर्थिक व्यवहार (Financial Transaction) साठी खूप महत्वाचे मानले जाते.
पॅन कार्ड (PAN Card) मध्ये  10 अंकाची संख्या असते. जी आयकर विभाग (Income Tax Department) मधून भेटतो. Pan Card Income Tax Act 1961  च्या नुसार भारतात Laminated Card च्या स्वरूपात बनते. जे Income Tax Department central board for direct taxes (CBDT) च्या देखरेख मध्ये दिले जाते. Pan Card income tax च्या payment साठी खूप महत्वाचे असते.

पॅन कार्ड (PAN Card) मध्ये जो नंबर असतो तो सर्व प्रकारच्या महत्वाच्या Financial Transaction साठी महत्वाचा असतो. जसे बँकेत खाते (Bank Account) खोलण्यासाठी, Taxable Salary मिळवण्यासाठी, धन संपत्ती आणि दागिने विकण्यासाठी किंवा घेण्यासाठी या सर्व ठिकाणी पॅन कार्ड (PAN Card) ची गरज पडते. याच्यासाठी कार्डवर Account Holder ची सर्व माहिती दिलेली असते. पॅन कार्ड (PAN Card) आपल्या Debit Card आणि Credit Card च्या आकाराचे असते. आणि याच्यावर आपले नाव , वडिलांचे नाव, जन्मतारीख, आपली सही आणि PAN (Permanent Account Number) आणि फोटो असतो.

Pan Card मध्ये 10 Digit चा Alphanumeric Number चा अर्थ काय असतो.

मी पहिलेच सांगितले आहे की पॅन कार्ड मध्ये 10 DIGIT चा ALPHANUMERIC NUMBER असतो. त्याच्यामध्ये आपली माहिती लपलेली असते. जसे AAECC6548C पहिले पाच अक्षर इंग्लिश चे ALPHABETS असतात. पुढील 4 DIGIT अंक असतात . आणि शेवटी परत एक ALPHABET असते. ह्या सर्व अंकाचा एक अर्थ असतो. आणि हे व्यक्तीच्या महत्वपूर्ण DETAILS सांगतात. तर चला आज याच्याबद्दल बघूया.

पहिले तीन अक्षर

पहिले तीन अक्षर एक Normal Alphabetic Series चे असतात. जे A to Z मधील असतात. जसे AZT किंवा ZRT सारखे तीन अक्षर मिळून असतात.

चौथे अक्षर

चौथे अक्षर कार्डचे महत्वाचे अक्षर असते. हे व्यक्तीच्या स्तिथी ची ओळख सांगतो. हे अक्षर पॅनकार्ड वर जास्तीत जास्त P असे असते. याचा अर्थ PERSON असा होतो. दुसरे 9 अक्षर चे चौथ्या CHARCTER चे वर्णन करतात ते पुढीलप्रमाणे

  1. A- Association of persons
  2. B- Body of individuals
  3. C- Company
  4. F- Firm
  5. G- Government
  6. H- Hindu undivided family
  7. L- Local authority
  8. J- Artificial juridical Person
  9. T- Trust

पाचवे अक्षर

जर पॅनकार्ड Personal असेल तर पाचवा अक्षर व्यक्तीचे शेवटच्या नावाचे (surname) पहिले अक्षर असते. जर पॅनकार्ड Trust, Organization, Company, Government इ. चे असेल तर नावातल्या पहिल्या letter पाचव्या अक्षरात असतो.

सहा ते नऊ

हे अक्षर 0001 पासून ते 9999 पर्यंत Random number असतात.

दहावे अक्षर

दहावे अक्षर 9 charcter मधून formula नुसार काढले जाते.

Pan Card का गरजेचे आहे?

  1. PAN CARD मध्ये photo, नाव, आणि सही हे ओळखपत्राच्या स्वरूपात आपण उपयोग करू शकतो.
  2. याचा मुख्य उपयोग tax भरण्यासाठी होतो. विना PAN CARD चे आपल्याला जास्त TAX भरावा लागू शकतो. PAN CARD वरचा UNIQUE NUMBER च्या मदतीने INCOME TAX DEPARTMENT एका व्यक्तीने केलेले सर्व TRANSACTION ला LINK करतात आणि त्याच्यावर नजर ठेवतात आणि tax ची चोरी थांबवू शकतो.
  3. हे फक्त tax भरण्यासाठीच नाही तर सर्व जास्त किमतीच्या transaction साठी महत्वाचे आहे job करणाऱ्या व्यक्तीला PAN CARD ची खूप गरज असते. त्याने त्यांना भूगतान करायला सोपं होते.
  4. आता कोणत्याही बँकेचं खाते खोलण्यासाठी PAN CARD आवश्यक आहे.
  5. PAN CARD आयकरच्या सर्व गडबडीपासून वाचवते.
  6. घर बांधण्यासाठी property घेताना किंवा विकताना PAN CARD ची गरज असते.
  7. जर तुम्ही NRI आहे तर PAN CARD च्या मदतीने PROPERTY घेऊ शकतो आणि या देशामध्ये आपला BUSSINESS सुरू करू शकतो.

PAN CARD बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. दोन पासपोर्ट size फोटो
  2. जन्म दाखला : याच्यासाठी Birth Certificate, Marriage Certificate, Metric Certificate, Passport, Driving License पैकी कोणतेही एक certificate देऊ शकता.
  3. Identity Proof: याच्यासाठी Voter Card, Pension Card, Aadhar Card, Ration Card इ. वापरू शकतो.
  4. Address Proof: याच्यासाठी Electricity Bill, Driving License, Passport, Aadhar Card, Telephone Bill इ. वापरू शकतो.

लक्षात असुद्या सर्व कागदपत्रे A4 size page मध्ये पाहिजेत त्या सर्व Documents ना Self Attested करणे गरजेचे आहे. Self Attested म्हणजे स्वतःची सही

पहिले PAN CARD फक्त सरकारी कर्मचार्यांसाठीच होते पण आता असे राहिलेले नाही कोणीपण व्यक्ती . कंपनी, ORGANIZATION इ. PAN साठी APPLY करू शकतात. NRI व्यक्ती म्हणजे जो या देशाचा नागरिक नाही. तो पण PAN CARD साठी APPLY करू शकतो. हे APPLY करणं सोप्प आहे . तुम्ही स्वतः income tax department च्या website incometaxindia.gov.in किंवा tin-nsdl.com किंवा utiitsl.com वर जाऊन पॅनकार्ड चा फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या गावात/शहरात असणाऱ्या सेवा केंद्रावर जाऊन PANCARD बनवु शकतात.

पॅनकार्ड बनवण्यासाठी 107 रुपये शुल्क लागते किंवा जास्त पण लागू शकते. जर तुम्ही पॅनकार्ड ऑनलाईन APPLY करत असाल तर NET BANKING ची गरज लागेल किंवा CREDIT CARD किंवा DEBIT CARD ने सुद्धा PAYMENT करू शकता.जर तुम्ही बाहेर पॅनकार्ड बनवत असाल तर पैसे सुद्धा देऊ शकता.पॅनकार्ड बनवल्या नंतर तुम्हाला एक नंबर दिला जातो त्या नंबर ने आपण पॅनकार्ड चे STUTUS काय आहे आणि ते तुमच्याकडे किती दिवसात पोहचेल ते समजते.

आपले भारत सरकार लवकरच PANCARD ला आधार कार्ड सारखे सरकारी कामात महत्वाचे करतील. त्यामुळे तुमच्याकडे हे कार्ड असणे गरजेचे आहे. जर तुमच्याजवळ हे कार्ड नसेल तर बनवून घ्या.
तुम्हाला पॅन कार्ड काय आहे. what is pan card in marathi हा लेख कसा वाटला ते COMMENT मध्ये सांगा .

अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!