जाणून घ्या स्वतःचा ब्लॉग (Blog) कसा सुरू कराल

ब्लॉग (Blog) हे असं एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. लेखन, ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकता. ज्या विषयाचं तुम्हाला सखोल ज्ञान आहे तो विषय ब्लॉगसाठी निवडता येतो. खरंतर ब्लॉग सुरू करणं फार कठीण मुळीच नाही. शिवाय आम्ही तुम्हाला ब्लॉग सुरू करण्याच्या प्रत्येक स्टेप्स सांगणार आहोत. सुरूवातीला छंद म्हणून फ्री मध्ये तुम्ही एखादा ब्लॉग सुरू करू शकता. त्यानंतर जेव्हा तुमचा ब्लॉग लोकांना आवडू लागेल तेव्हा तुम्ही थोडे पैसे खर्च करून त्याला एखाद्या वेबसाईटचे रूप देऊ शकता. एखादा ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहित असणं फार गरजेचं आहे.

ब्लॉग (Blog) सुरू करण्यामागचा हेतू काय असावा ?

ब्लॉग सुरू करण्याची अनेक कारणे असू शकतात. जसं की तुमच्या मध्ये एखादं अनोखं कौशल्य असेल तर ते तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून जगासमोर आणू शकता. शिवाय जर तुम्ही उद्योगपती असाल तर तुमचा व्यवसाय तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून वाढवू शकता. अगदी काहीच नाही तर घरबसल्या पैसे कमावण्यासाठीही तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉग सुरू करण्यामागे तुमचा हेतू कोणता आहे हे तुमच्या आवडी-निवडीवर अवलंबून आहे.

ब्लॉग (Blog) सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ?

जर तुम्ही पहिल्यांदाच तुमचं ब्लॉग सुरू करत असाल तर त्या आधी तुम्हाला ब्लॉगिंग विषयी माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. यासाठी ब्लॉगिंग कॅटगरी मध्ये जाऊन एससीओ (SEO) विषयी सर्व माहिती समजून घ्या. कारण या माहितीचा तुम्हाला एक यशस्वी ब्लॉगर होण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. आम्ही तुम्हाला ब्लॉग सुरू करण्याआधी माहित असायला हव्या अशा काही गोष्टी सांगत आहोत

  1. सर्वात आधी ब्लॉगसाठी तुमचा विषय निवडा
  2. विषय निवडून झाल्यावर तुमच्या ब्लॉगचं माध्यम निवडा म्हणजे तुम्ही फ्री ब्लॉग सुरू करत आहात की पेड तसंच तुम्ही ब्लॉगसाठी वर्डप्रेस, ब्लॉग किंवा ब्लॉगस्पॉट डॉट कॉम यापैकी कोणतं अॅप वापरणार आहात याचाही विचार करा.
  3. तुमच्या ब्लॉगचं युनिक डोमेन मिळविण्यासाठी थोडा वेळ घ्या. कारण यामुळे तुमच्या ब्लॉगला इतरांपेक्षा एक वेगळी ओळख मिळेल.
  4. जर होस्टिंग खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर ब्लॉगरमधून गुगल वरील फ्री होस्टिंग आणि हटके थीम वापरुन तुम्ही तुमच्या ब्लॉगची सुरूवात करू शकता.
  5. तुम्ही ब्लॉगमध्ये नेमका कोणता कंटेट वापरणार आहात हे ठरवा. कारण तुमचं कंटेट चांगलं असेल तरच युझर तुमच्या ब्लॉगसाठी जास्त वेळ देतील.

ब्लॉगचं डोमेन नेम (Domain Name) कसं निवडाल?

डोमेन नेम हे तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईटचं नाव असतं. इंटरनेटवर तुमचं वेबसाईट पेज ओपन होण्यासाठी या ऍड्रेसची गरज असते. हे डोमेन नेम www ने सुरू होत असतं. समजा तुमच्या ब्लॉगचं नाव ‘माझा ब्लॉग’ असं तुम्हाला ठेवायचं असेल तर तुमचं डोमेन नेम असं www.mazablog.in असू शकेल. खरंतर डोमेन नेम विनामुल्यही मिळू शकतं मात्र जर तुमच्या मनाप्रमाणे नाव मिळत नसेल तर तुम्हाला ते खरेदी करावं लागतं. तुम्ही डोमेन नेम देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्ही ते 99 ते 199 रू. खर्च करून खरेदी करू शकता.

वेब होस्टिंग ( Web Hosting) म्हणजे काय ?

वेब होस्टिंग तुमच्या ब्लॉगसाठी इंटरनेटवर जागा मिळवून देतं. ज्यामुळे इतर लोक तुमचा ब्लॉग इंटननेटवर बघू शकतात. वेब होस्टिंग शिवाय इतर लोक तुमचा ब्लॉग इंटरनेटवर पाहू शकत नाहीत. तुम्ही जर तुमचा ब्लॉग ब्लॉगस्पॉट.कॉमवर सुरू करणार असाल तर तुम्हाला वेब होस्टिंग फ्रीमध्ये मिळू शकतं. मात्र दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर यासाठी तुम्हाला 1500 ते 5000 रू. वेब होस्टिंगसाठी पेड करावे लागतील.

तुमचा ब्लॉग कसा तयार कराल? (How to Create a Blog)

ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला या पाच स्टेप लक्षात ठेवाव्या लागतील. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरू करू शकता.

स्टेप 1 तुमचं मार्केट निवडा (Choose Market)

1. ध्येयवेड (Passion)

एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला Passion असेल तर तुम्ही ती गोष्ट जगासमोर मांडण्यासाठी ब्लॉग सुरू करू शकता. मात्र तुमचं हे वेड इतरांना उपयोगाचं आहे का हे जरूर पडताळून बघा.

2. ज्ञान (Knowledge)

एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला सखोल ज्ञान असेल तर ते लोकांपर्यंत पोहचविण्यासाठीही तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता. मात्र असं असलं तरी तुमचं ज्ञान इतरांच्या उपयोगी पडणारं मात्र नक्कीच असायला हवं. जर तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून इतरांच्या समस्या दूर करणार असाल अथवा त्यांना त्या ज्ञानाचा उपयोग होणार असेल तर तुम्ही त्या ज्ञानावर आधारित ब्लॉग नक्कीच सुरू करू शकता.

स्टेप 2- ब्लॉगची व्यवस्था करा (Setup Blog)

तुमचं मार्केट ठरवल्यावर तुम्हाला या ब्लॉगसाठी योग्य प्लॅटफॉर्म निवडावं लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार या दोन प्लॅटफॉर्मपैकी कोणताही प्लॅटफॉर्म तुमच्या ब्लॉगसाठी निवडू शकता.

1. फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म  ( Free blogging platform )

जर तुम्हाला पैसे खर्च न करता ब्लॉग सुरू करायचा असेल तर तुम्ही blogger.com ब्लॉग सुरू करू शकता. गुगल मार्फत तयार करण्यात आलेलं हे एक प्लॅटफॉर्म आहे. मात्र जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरील गाईडलाईन्स अथवा नियम पाळले नाहीत तर तुमचा ब्लॉग कधीही बंद केला जाऊ शकतो. असं होऊ नये यासाठी एक डोमेन नेम विकत घ्या आणि तुमच्या ब्लॉगसोबत ते अटॅच करा.

2. पेड ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Paid Blogging platform)

जर तुमची ब्लॉगवर पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर वर्डप्रेस  (wordpress) वर ब्लॉग सुरू करणं अगदी उत्तम राहिल. ब्लॉगिंगसाठी हे प्लॅटफॉर्म एक उत्तम माध्यम आहे. यासाठी तुम्ही तुम्हाला एक डोमेन नेम आणि होस्टिंग स्पेस विकत घेण्याची गरज आहे. तुम्हाला दरवर्षी यासाठी एक ठराविक रक्कम पेड करावी लागेल. पेड प्लॅटफॉर्मचा फायदा हा असतो की यामुळे ब्लॉगवरील संपूर्ण कंट्रोल तुमच्याकडेच राहतो आणि तुमचा ब्लॉग तुमच्याशिवाय इतर कोणीही बंद करू शकत नाही.

स्टेप 3 – कंटेट तयार करा (Create Content)

ब्लॉग सुरू करण्याच्या प्रोसेसमधील ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. कारण तुमचा कंटेट चांगला असेल तरच युझर्स तुमच्या ब्लॉग वर जास्त काळ राहतील. जर कंटेट आवडला नाही तर ते पुन्हा तुमचा ब्लॉग पाहणार नाहीत. यासाठी चांगला कंटेट तयार करण्यावर भर द्या. शिवाय तुमच्या पेजवरील  about us, contact us, privacy policy, disclaimer ही माहिती अवश्य तयार ठेवा. तुमच्या पेजवर तीस ते चाळीस आर्टिकल झाल्यावर तुमच्या ब्लॉगला मोनिटाईझ करायला सरूवात करा.

स्टेप 4 – मॉनिटाईझ (Monetize)

जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरून पैसे कमवायचे असतील तर आता तुम्हाला तुमचा ब्लॉग Monetize करावा लागेल. ब्लॉग Monetize करण्यासाठी तुम्ही या तीन पद्धतींचा वापर करू शकता.

1. गुगल ऍडसेन्स (Google Adsense)

बऱ्याचदा ब्लॉगर आपल्या ब्लॉगला ऍडसेन्सने Monetize करत असतात. कारण ऑनलाईनच्या जगात हे एक खात्रीदायक माध्यम आहे.

2. अफिलिएट (Affiliate)

जेव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉगला या पद्धतीने Monetize करता तेव्हा यात ज्या कंपनीला तुम्ही अफिलिएट करता त्या कंपनीचे प्रॉडक्ट तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून प्रमोट केले जातात. ज्यामुळे या उत्पादनांच्या विक्रीवर तुम्हाला कमीशन मिळू लागतं.

3. डायरेक्ट सेल (Direct Sell Your Ad Space)

जर तुमचा ब्लॉग मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत असेल तर तुम्ही एखाद्या ऍड कंपनीसोबत डायरेक्ट संपर्क साधून तुमच्या ब्लॉगमधील ऍड स्पेस त्यांना विकू शकता.

स्टेप 5 – ब्लॉगला प्रमोट कसे कराल? (How to promote your blog )

तुम्ही तुमचा ब्लॉग तर तयार केला आहे पण तो जोपर्यंत तुम्ही तो प्रमोट करत नाही तोपर्यंत लोकांना त्याबाबत माहिती मिळणार नाही. यासाठी तुम्ही तुमच्या ब्लॉगपेजला फेसबूक, ट्वीटर, इंस्ट्राग्राम, लिंकडीन, गुगलप्लस अशा सर्व सोशल मीडिया माध्यमांवर प्रमोट करू शकता. शिवाय या माध्यमांवर तुम्ही तुमच्या ब्लॉगचं पेज आणि प्रोफाईल तयार करुन त्यामध्ये तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना जोडू शकता. सोशल मीडियावर सतत पोस्ट अपडेट करत रहा ज्यामुळे लोक तुमच्या ब्लॉगवर भेट देतील आणि तुमच्या ब्लॉगवरील ट्राफीक वाढेल. लक्षात ठेवा ब्लॉगला प्रमोट करण्यासाठी फेसबूक आणि कोरा (Quora) वर तुमच्या ब्लॉगच्या लिंक शेअर करा. कारण या माध्यमांवर तुम्हाला लवकर उत्तम प्रतिसाद मिळेल.

टॉप ब्लॉगिंग वेबसाईट(Top Blogging websites)

आम्ही तुम्हाला टॉपवर असलेल्या काही ब्लॉगिंग वेबसाईटची नावे देत आहोत. या वेबसाईटवर तुम्ही केवळ वीस मिनीटांच्या आत तुमचा ब्लॉग तयार करू शकता. शिवाय यासाठी तुम्हाला डोमेन नेम खरेदी करण्याची किंवा होस्टिंग स्पेससाठी पैसे मोजण्याची देखील मुळीच गरज नाही.

ब्लॉगर.कॉम  (Blogger.com)

भारतीय ब्लॉगर्सची ही एक लोकप्रिय ब्लॉगिंग वेबसाईट आहे. एकतर या वेबसाईटला मेंटेन करणं फार सोपं आहे. जर तुम्ही गुगलवरील एखाद्या फंक्शनचा वापर करत असाल तर तुम्ही त्यावरच ब्लॉगरसाठी लॉग इन करू शकता. ब्लॉगरवर तुम्हाला विविध भाषा टाईप करणे, एका पेक्षा अधिक ब्लॉग तयार करणे, आरएसएस फीड पाहणे आणि वाचणे, सामूहिक ब्लॉग तयार करणे अशा अनेक गोष्टींची व्यवस्था मिळू शकते. शिवाय गुगलवर याची रेटींग तुलनेने इतर प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक असते.

माय स्पेस (Myspace.com)

तरुणाईमध्ये ही माय स्पेस वेबसाईट प्रचंड लोकप्रिय आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉगिंगसाठी ही वेबसाईट अधिक प्रमाणात वापरली जाते. यामध्ये हॅंगआऊट, व्हिडीओ, गेम्स आणि गाणी अशा सुविधा उपलब्ध असतात. माय स्पेसमुळे तुम्ही डिजीटल माध्यमावर तुम्ही तुमची एक वेगळी ओळख निर्माण करू शकता.

वर्डस्पेस (WordPress.com)

प्रोफेशनल ब्लॉगर वर्डप्रेस ब्लॉगिंग वेबसाईटला अधिक पसंत करतात. कारण वर्डस्पेस वापरण्यास अगदी सोपं आणि क्लासी थीमचं असल्यामुळे अनेक जण प्रोफेशनल ब्लॉगिंगसाठी वापरतात. या वेबसाईटवर तुमच्या ब्लॉगसाठी विविध सुविधा तर असतातच शिवाय त्यामुळे तुमच्या ब्लॉगला प्रोफेशनल लुकही मिळू शकतो. तुम्ही जर वर्डप्रेसची पेड सर्व्हिस घेऊ ईच्छिता तर अगदी कमी पैशांमध्ये तुम्हाला ही सोय मिळू शकते.

लाईव्ह जर्नल.कॉम (LiveJournal.com)

लाईव्ह जर्नल ब्लॉगिंग वेबसाईट पूर्णपणे फ्री आहे. या वेबासाईटवर ब्लॉग तयार करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाहीत. या वेबसाईटवर असे अनेक इनोवेटिव्ह ब्लॉग तयार केले जातात ज्यांना युझर्स दीर्घकाळापर्यंत चांगली प्रतिक्रिया देतात. ही वेबसाईट ओपन सोर्सवर आधारित आहे.

आम्ही दिलेल्या या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग नक्कीच सुरू करू शकता. तुमच्या ब्लॉगवरील कंटेट ‘बेस्ट’ असेल तर यातून तुम्हाला चांगले उत्पन्नही मिळू शकते.

अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!