माणसाप्रमाणे प्राण्याला स्वप्न पडते का?
तर हो हे खरं आहे की माणसाप्रमाणे प्राण्यांना पण स्वप्न पडतात.
जेव्हा तुम्ही घरी पाळलेल्या कुत्र्याला किंवा मांजराला शांत झोपण्याऐवजी पाय हलवताना, ओरडताना किंवा काहीतरी वेगळं करताना पाहता तेव्हा शक्यता आहे की आपले हे मित्र स्वप्न बघत असतील.
अनेक सस्तन प्राण्यांचे झोपेचे चक्र हे आपल्यासारखे असते. यामध्ये सस्तन प्राण्यांची झोप गाढ झोपेतून मेंदूचा सक्रियपणा कमी करणार्या झोपेमध्ये रुपांतरीत होते. मग ईथून ते आरईएम (REM sleep phase) झोपेत जातात, ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यांची मोठमोठ्याने उघडझाप होते. (REM=Rapid Eye Motion)
याच झोपेच्या आरईएम टप्प्यात प्राणी स्वप्न पाहत असतात.
तुमचे पाळीव प्राणी जी स्वप्ने पाहतात त्या स्वप्नांवर तुम्ही खूप प्रभाव पाडत असता. आपल्यासारखच पेट्स पण मित्र, परिवार आणि दररोजच्या रुटीन बद्दल स्वप्न पाहत असतात. पण ती स्वप्न नेमकी कशी आणि केवढी विचित्र असतील हे मात्र एक रहस्य आहे.
पण आपल्याकडे काही नोंदी आहेत ज्यामध्ये प्राण्यांनी काय पाहिलं असेल स्वप्नात याचा आपण अंदाज बांधू शकतो.
१)MIT च्या एका संशोधनामध्ये तिथल्या शास्त्रज्ञांनी उंदरांना एका गोलाकार मार्गावर पाळण्यासाठी प्रशिक्षित (Train) केलं.
त्यांनी त्या टास्कच्या वेळी उंदरांच्या मेंदूच्या अॅक्टिव्हिटींचे आणि उंदीर झोपलेले असतानाच्या ब्रेन अॅक्टिव्हिटींचे निरीक्षण केले, तेव्हा जवळपास अर्ध्या उंदरांच्या मेंदूच्या अॅक्टिव्हिटी टास्क वेळच्या अॅक्टिव्हिटीसोबत जुळत होत्या. म्हणजेच वारंवार तीच तीच कॉलेज किंवा जॉबच्या ठिकाणची आपल्याला पडणार्या स्वप्नासारखीच प्राणी पण तीच तीच स्वप्न पाहू शकतात.
२)स्लीप रिसर्चर डॉ. मिशेल जौवेत (Dr. Michel Jouvet) यांनी मांजरांच्या आरईएम (REM phase) मधील झोपेचे निरीक्षण केले. जेव्हा मांजरी झोपेच्या बाकीच्या टप्प्यात असतात तेव्हा शांत झोपलेल्या असतात पण आरईएम(REM phase) मधे गेल्यानंतर मांजरांनी झोपेत धक्के, उड्या मारल्यासारखे तसेच काल्पनिक वस्तूंना चावल्यासारखे करायला सुरुवात केली. या निरीक्षणांवरुन डॉ. मिशेल यांनी सांगितले की मांजरी नक्कीच स्वप्न बघतात.
३)तसेच जगात फक्त दोनच प्राणी आहेत ज्यांनी आपल्याला त्यांना पडलेली स्वप्नं सांगितली आहेत. कोको आणि मायकल नावाचे दोन गोरील्ला.
कोको आणि मायकल हे दोन्ही गोरील्ला सांकेतिक भाषा (Sign language) शिकल्यामुळे प्रसिद्ध झाले होते. कोको कधी कधी झोपेतून उठल्यावर एखाद्या विलक्षण ठिकाणांबद्दल, लोकांबद्दल किंवा घटनेबद्दल सांकेतिक भाषेत सांगत असे आणि मायकल कधी सांकेतिक भाषेत सांगायचा, “वाईट लोक गोरील्लांना मारतात.”
या वरील सर्व घटनांचा विचार केला तर आपण म्हणू शकतो की प्राणी स्वप्न नक्कीच पाहत असतात.
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/