जर आपले आयुष्य एक खेळ आहे, तर मग कोणता खेळ आहे?
अनेक प्रकारचे खेळ आपल्या आयुष्यात खेळले जातात. रस्त्यावर तर कधी कामात, समाजात औट घटकेचे खेळ आपले मनोरंजन करतात तर कधी आपलं पार अवसान काढतात.
- सायकलीचा खेळ आठवा सायकलीचे चाक एक पुढे एक मागे आपण पण आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर संसाराची सायकल चालवत असतो आणि सर्व ताळ मेळ सांभाळून ही सायकल चालवली जाते ह्या प्रवासाची मजा कशी घ्याची हे आपल्यावरच अवलंबून असत.
- सोंगट्यांसारखे आपण कधी वापरले जातो तर कधी आपण दुसऱ्याचा वापर करतो कधी जिंकतो तर कधी हरतो.
- हवाई खेळ खेळण्याची हौस मोठी असते व त्या साठी आपली पाहिजे तेवढे पैसे देण्याची क्षमता असते आणि तसंही म्हणतात ना हौसेला मोल नाही.
- गलोल हातात घेऊन बरोबर तिथे नेम मारायचा खेळ आपण खेळलो आहोत मार्च महिन्यात टारगेट पूर्ण झाली कि वाढीव पगाराच फळ हातात येत.
- पावसाळ्यात लांब उडी मारत मारत आपण रस्त्यातले खड्डे पार करत असतो.
- आपलं आयुष्य हा जर अथांग सागर समजला आपण एक होडी तर कधीतरी आत्मविश्वाच्या शीडांमध्ये वारे कमी झाले भरून घ्याचे आणि निघायचे पुढच्या सफरीला नव्या किनाऱ्याच्या शोधात.
- सुख दुःखाचा लपंडावाचा खेळ आपल्या आयुष्याला पुरलेला आहे.
- अनेकांना आपल्या कुटुंबाचा भार उचलावा लागतो. प्रमाणापेक्षा भार उचलता एखाद्याचे कंबरडे पार मोडून निघते.
- लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत आपण खेळतो एखाद्याने भारी गाडी घेतली दुसरा त्याहून भारी गाडी घेतो हा चढा ओढीचा खेळ चालूच राहतो.
- रमी सारखे एखादे भारी पान असूनही आपण डाव हरलेला असतो.
- कामामध्ये श्रेयासाठी चाललेली रस्सीखेच तर आपण सगळेच अनुभवतो.
- गुराखी काठीने गुरे वळवतो तर बिलीयर्ड खेळत खेळाडू बाॅल हाकतो असं आपण म्हणू शकतो.
असा हा खेळ चालूच राहतो नीट बघितलं तर प्रत्येक खेळ कशाशी तरी निगडीत आहे.