गर्भधारणा टाळण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत?
गर्भनिरोधन हा सर्वांच्या ओळखीचा माहित असणारा आणि कानात कुजबुजण्याचा विषय, ज्यांना शारीरिक संबंधांचा अनुभव नाही आणि ज्यांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा विषय क्लीष्ट आहे.
चांगले गर्भनिरोधकामध्ये खालील गुणधर्म असावेत
१. उपलब्धता – सहजासहजी बाजारात उपलब्ध होणारे असावे नाहीतर “शोधलं कि सापडतं” असं म्हणता म्हणता “याचसाठी केला होता अट्टाहास” असे वाटायला नको.
२. सुरक्षित – प्रणय क्रियेत सहभागी होण्याऱ्या दोन्ही व्यक्तींसाठी
३. किंमत – स्वस्त म्हणजे खराब किंवा महाग म्हणजे चांगले या संकल्पना नको. पण हो खिशाला आणि मनाला परवडणारे हवे.
४. सहजता आणि आवड – रोजच्या वस्तू किंवा कपडे आपण आपल्या आवडीचे किंवा वापरायला सहज सोपे असे घेतो मग गर्भनिरोधक सुद्धा तितकेच सहज आणि आवडीचे असावे..
खालील प्रकार हे गर्भनिरोधनासाठी वापरले जातात.
१. गर्भ निरोधक गोळ्या – स्त्रियांकडून वापरला जाणारा सहज सोपा प्रकार (फायदा – गर्भधारणा टाळता येते आणि जेव्हा हवी तेव्हा गोळ्या थांबवल्या कि परत गर्भधारणा होते. तोटा – गुप्तरोग,HIV पासून संरक्षण मिळत नाही.)
२. I – Pill– कालच्या रात्री भावनेच्या ओघात झालेल्या चुकिपासुन ती तुम्हाला वाचवू शकते पण गुप्तरोगांपासून नाही. (तिचे बरेच गंभीर दुष्परिणाम आहेत जसे – गरगरणे, मळमळणे, चक्कर, अशक्तपणा इ. डॉक्टर च्या सल्ल्याशिवाय घेणे टाळावे.)
३. Copper T (तांबी) -हे गर्भाशयाच्या तोंडावर डॉक्टरांद्वारे बसवले जाते. ५ वर्ष, १० वर्षांसाठी बसवले जाते. जास्त खर्चिक नाहीये. पण हो यानेही गुप्तरोग HIV वैगरे टाळता येत नाहीत
४. संप्रेरकांची इंजेक्शन्स.– संप्रेरकांची इंजेक्शन्स घेऊनही गर्भधारणा टाळता येते. ह्या बद्दल स्त्री रोग तज्ज्ञच अधिक माहिती देऊ शकतील
५.स्त्रियांसाठी निरोध – पुरुषांप्रमाणे स्त्रियांसाठी सुद्धा निरोध असतात पण भारतीय सहज बाजारात उपलब्ध होतील कीं नाही याची शंका आहे.
६. पुरुषांसाठी निरोध– सर्वात जास्त प्रचलित असणारा आणि गुप्तरोग व HIV पासून उत्तम संरक्षण देणारा प्रकार. बऱ्याच फ्लेवर्स आणि इतर प्रकारांमध्ये सहज उपलब्ध असल्याने याचा वापर जास्त होताना दिसतो. शिवाय सरकारी दवाखान्यात कोणत्याही शुल्काशिवाय मिळते. आणि माझ्यामते हा गर्भधारणा टाळण्या साठी चा सोपा (घरगुती)उपाय आहे.
७. ज्या स्त्रियांची पाळी अगदी वेळच्या वेळी येते त्यांनी ovulation च्या काळात शरीर संबंध टाळले तरी गर्भ धारणा टाळता येऊ शकते. पण हे थोडे कठीणच म्हणावे लागेल.
Source of content : वरील माहिती ही नुकत्याच माझ्या वाचनात आलेल्या डॉ. शलाका शिंत्रे शिंपी यांच्या पोस्ट मधून घेतलेली आहे…
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/