डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? । What is Digital Marketing?

माहिती भांडार कडून सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी मातृभाषेतून “डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असते” ते जाणून घेऊ.

सर्वात प्रथम ब्लॉग मध्ये काय मुद्दे असणार आहे ते बघू .

  1. मार्केटिंग म्हणजे काय?
  2. पारंपारिक मार्केटिंग विरुद्ध डिजिटल मार्केटिंग
  3. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
  4. डिजिटल मार्केटिंगचे फायदे
  5. डिजिटल मार्केटींगचे घटक
  6. डेटा-चालित डिजिटल मार्केटिंग
  7. इंटरनेट वरून पैसे कसे कमवायचे
  8. डिजिटल मार्केटिंग मधील करियरच्या संधी

आता आपण एक -एक मुद्दा बघू ….


१. मार्केटिंग म्हणजे काय?

मार्केटिंग च्या तस्या बऱ्याच व्याख्या आहेत. पण आपण व्याख्या बघणार नाही आहोत तर मार्केटिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ते थोडक्यात पाहू .

  1. ग्राहक (Customer) – एखादी व्यक्ती जी दुकान किंवा व्यवसायातून वस्तू किंवा सेवा खरेदी करतो.
  2. नवीन करणे (Innovate) – विशेषत: नवीन पद्धती, कल्पना किंवा उत्पादने सादर करून स्थापित केलेल्या काही गोष्टींमध्ये बदल करणे.
  3. जाहिरात (Advertising) – जाहिरात हे उत्पादन किंवा सेवेच्या वापरकर्त्यांशी (Users) संवाद साधण्याचे साधन आहे.
  4. उपाय (Solution) – समस्या सोडवण्याचे किंवा कठीण परिस्थितीशी सामोरे जाण्याचे साधन.
  5. संकल्पना (Concept) – एखाद्या वस्तूची विक्री किंवा जाहिरात करण्यात मदत करण्यासाठी कल्पना किंवा शोध.
  6. ब्रँडिंग (Branding) – विशिष्ट डिझाइनद्वारे एखाद्या विशिष्ट उत्पादनाची किंवा कंपनीची जाहिरात.
  7. रणनीती (Strategy) – दीर्घकालीन किंवा एकूण उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार केलेली कृती योजना.
  8. संधी (Opportunity) – एक वेळ किंवा परिस्थिती ज्यामुळे काहीतरी करणे शक्य होते
  9. संशोधन (Research) – तथ्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि नवीन निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पद्धतशीरपणे तपासणी आणि साहित्य आणि स्त्रोतांचा अभ्यास.

२. पारंपारिक मार्केटिंग विरुद्ध डिजिटल मार्केटिंग

पारंपारिक मार्केटिंग हे ऑफलाइन धोरणांवर अवलंबून असते, ज्यात थेट विक्री, थेट मेल (पोस्टकार्ड, ब्रोशर, पत्रे, उड्डाण करणारे हवाई परिवहन), ट्रेडशो, मुद्रण जाहिराती (मासिके, वर्तमानपत्रे, कूपन पुस्तके, होर्डिंग्ज), रेफरल (वर्ड-ऑफ-माऊथ मार्केटींग असेही म्हटले जाते), रेडिओ आणि दूरदर्शन. बर्‍याच प्रकरणांमध्ये, पारंपारिक विपणनाचे ध्येय ब्रँड जागरूकता निर्माण करणे आहे.

डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंग चा एक घटक आहे. जो इंटरनेट आणि ऑनलाइन आधारित डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतो जसे की संगणक, मोबाइल फोन, डिजिटल मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म वर उत्पादने आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी.


३. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंग चा एक घटक आहे. जो इंटरनेट आणि ऑनलाइन आधारित डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतो जसे की संगणक, मोबाइल फोन, डिजिटल मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म वर उत्पादने आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी.

१९९० आणि २००० च्या दशकात झालेल्या विकासामुळे ब्रँड आणि व्यवसाय मार्केटिंग साठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग बदलला. जसे की दैनंदिन जीवनात संगणक, मोबाइल फोन, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापर वाढत गेल्याने लोक दुकानांवर जाण्याऐवजी डिजिटल उपकरणांचा वापर करून वस्तू व सेवा खरेदी करू लागले.

डिजिटल मार्केटिंग हा जरी मार्केटिंग चा भाग असला तरी , डिजिटल मार्केटिंग चे पण बरेच घटक आहेत जसे ,

  1. संकेतस्थळ (Website)
  2. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization [SEO])
  3. शोध इंजिन मार्केटिंग (Search Engine Marketing [SEM])
  4. प्रदर्शन नेटवर्क जाहिरात (Display Network Ads)
  5. सोशल व्हिडिओ मार्केटिंग (Social Video Marketing)
  6. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing [SEM])
  7. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
  8. एसएमएस मार्केटिंग (SMS Marketing)
  9. संलग्न मार्केटिंग (Affiliate Marketing)
  10. ई-कॉमर्स (E-Commerce)

पुढील मुद्दया मध्ये डिजिटल मार्केटिंग च्या घटका बद्दल आपण माहित घेणारच आहोत. त्या साठी वाचन चालू ठेवा …..


४. डिजिटल मार्केटिंगचे फायदे (Advantages of Digital Marketing)

  1. विशिष्ट (Specific)

पारंपारिक मार्केटिंग मध्ये सर्वांना जाहिरात दाखवावी लागते पण डिजिटल मार्केटिंग मध्ये विशिष्ट प्रकारातील (म्हणजे लोकांची आवड, छंद, काम करायचा हुद्दा, राहणीमान, आर्थिक स्थिती आणि बरेच काही विचारात घेऊन) विशिष्ट लोकांना लक्ष्य करून आपण आपली जाहिर दाखवू शकतो.

  1. मोजण्यायोग्य (Measurable)

पारंपारिक मार्केटिंग मध्ये आपण जर वृत्तपत्रात उत्पादने आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी जाहिरात दिल्या नंतर किती लोकांनी ती बघितली, किती लोकांनी उत्पादने/सेवांची चौकशी केली आणि किती लोकांनी ती उत्पादने/सेवां विकत घेतली व नफा-तोटा किती झाला त्याबद्दलचे गणित करणे फार कठीण असते. पण डिजिटल मार्केटिंग मध्ये हीच गोष्ट फार सोपी आहे व मोजण्यायोग्य आहे.

  1. प्रवृत्त करण्यायोग्य (Actionable)

डिजिटल मार्केटिंग मध्ये लोकांना झटपट कृती करून (Call-To-Action) उत्पादने आणि सेवां विकत घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती बनवता येतात. ते पारंपरिक मार्केटिंग थोडे अवघड आहे.

  1. संबंधित (Relevant)

डिजिटल मार्केटिंग मध्ये “जो कोणी काही शोधात आहे त्याला आपण त्याच संबंधित जाहिरात दाखवू शकतो”. उदाहरण: तुम्ही गूगल वर कोणती तरी वस्तू शोधली – तुम्ही त्या वस्तूच्या संकेतस्थळी पोहोचला – पण वस्तू खरेदी नकरता संकेतस्थळा वरून बाहेर आलात – त्या नंतर तुम्हाला त्याच वस्तू संबंधित जाहिरात इतरत्र वेबसाइट्स , मोबाइल अँप्लिकेशन्स वर दिसायला लागते.

  1. वेळेच बंधन (Time Bond)

डिजिटल मार्केटिंग मध्ये जाहिरात हि वेळे नुसार चालू बंद करता येते.


५. डिजिटल मार्केटींगचे घटक (Components of Digital Marketing)

  1. संकेतस्थळ (Website)

वेबसाइट हि एका दुकाना सारखी काम करते जिथे बहुतेक लोक आपल्या ग्राहकाशी वस्तू / सेवा बद्दल संवाद साधतात. आपल्या दोन्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटिंग क्रिया कदाचित आपल्या वेबसाइटवर वापरकर्त्यांना पाठवतील. आपल्या सेवा आणि उत्पादनांविषयी माहिती मिळविणे, बुकिंग करणे किंवा खरेदी करणे किंवा संपर्क तपशील मिळवणे अशी कामे वेबसाइट करते.

  1. शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization [SEO])

सर्वांना शोध इंजिन (Search Engine – आपले Google) माहीत असेच, ज्या ठिकाणी आपण सर्व गोष्टी शोधात असतो मग तो रस्ता असो वा वस्तू. आता शोध इंजिन ऑप्टिमायझेशनचा त्याच्याशी काय संबंध आहे, तर फार मोठा संबंध आहे. तो असा, ज्या वेळी तुम्ही गूगल वर सर्च करता जी कोणती पहिली लिंक येते त्या वर तुम्ही क्लिक करता व माहिती मिळवता … बरोबर बोलतोय ना. पण तीच लिंक का पहिली आली ह्याचा आपण कधी विचार केला आहे का ?

शोध इंजिन ऑप्टिमायझेशन हि वेबसाइट ची गुणवत्ता वाढवण्याची प्रक्रिया आहे त्या मुळे तुम्ही गूगल सर्च मध्ये वेबसाइट ची लिंक पहिल्या क्रमांका वर अनु शकता. त्या मुळे वेब पृष्ठाची दृश्यमानता (Search Impressions) वाढवून वेबसाइट रहदारी (Traffic) पण वाढते.

  1. शोध इंजिन मार्केटिंग (Search Engine Marketing [SEM])

शोध इंजिन मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग चा भाग आहे ज्यामध्ये सर्च इंजिन सेवा पुरवणाऱ्या कंपनी ला (गूगल, बिंग इ.) पैसे देऊन वेबसाइट्सची जाहिरात केली जाते व वेबसाइट ची लिंक पहिल्या क्रमांका वर आणली जाते. त्या मुळे वेब पृष्ठाची दृश्यमानता (Search Impressions) वाढवून वेबसाइट रहदारी (Traffic) पण वाढते त्या मुळे वस्तूंची विक्री वाढते व व्यवसाय पण वाढवला जातो.

  1. प्रदर्शन नेटवर्क जाहिरात (Display Network Ads)

डिस्प्ले नेटवर्क ऍड्स आपल्या आवडत्या वेबसाइट ब्राउझ करीत असताना, मित्राला व्हिडिओ दर्शवित असताना, त्यांचे ई-मेल खाते तपासताना किंवा मोबाइल डिव्हाइस आणि अँप्लिकेशन्स वापरत असताना लोकांपर्यंत चित्र रूपातील जाहिरात पोहोचण्यात आपली मदत करू शकते.

Google डिस्प्ले नेटवर्क आपल्याला योग्य प्रेक्षक शोधण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याचे लक्ष्यीकरण पर्याय संभाव्य ग्राहकांना योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आपला संदेश रणनीतिकपणे दर्शवू देतात.

  1. सोशल व्हिडिओ मार्केटिंग (Social Video Marketing)

बरेच जण वेबसाईट ब्राउझ करीत असताना, YouTube वर विडिओ पाहत असताना व Facebook वर अपडेट्स चेक करत असताना सर्वांना जाहिरातीचे व्हिडिओज दिसत असतील. तेच विडिओ वापरून प्रेक्षकांची सहभाग वाढवणे, वस्तू ची विक्री करणे त्यालाच सोशल व्हिडिओ मार्केटिंग म्हणतात.

  1. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing [SEM])

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे उत्पादन किंवा सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Facebook, YouTube, Instagram & LinkedIn) आणि वेबसाइटचा वापर करून वस्तूंची विक्री वाढवणे.

  1. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)

ईमेल मार्केटिंग हि एक व्यावसायिक ई-मेल संदेश पाठविण्याची क्रिया आहे. या प्रक्रियेत विशेषत: लोकांच्या ई-मेल ची यादी बनवली जाते (ऑनलाईन सर्वे करून लोकांची आवड, छंद, काम करायचा हुद्दा, राहणीमान, आर्थिक स्थिती आणि बरेच काही विचारात घेऊन यादी बनवली जाते) व जरुरती प्रमाणे यादीचा उपयोग करून लोकांना वस्तू/सेवांची जाहिरात ई-मेल पाठवून केली जाते.

  1. एसएमएस मार्केटिंग (SMS Marketing)

एसएमएस मार्केटिंगमध्ये लोकांना वस्तू/सेवांची ऑफर जाहिरात, एसएमएस द्वारे एका विशिष्ट वेळेला पाठवून लोकांना सतर्क केले जाते.

  1. संलग्न मार्केटिंग (Affiliate Marketing)

अफिलिएट मार्केटिंग मध्ये वस्तूची विक्री पारंपरिक मार्केटिंगने नकरता कंपनीज लोकांचा (अफिलिएट मार्केटर) सहयोग घेऊन ग्राहकांपर्येन्त पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्या साठी अफिलिएट मार्केटर त्यांच्याच वेबसाइट वर, सोशल मीडिया अकाउंट वर कंपनीच्या वस्तूची लिंक तयार करून इतरांना जाहिरात करतात आणि जर त्या लिंक मधून वस्तूची विक्री झाली कि अफिलिएट मार्केटरला केलेल्या प्रत्येक विक्रीसाठी नफ्याचा एक छोटासा भाग (कमिशन) मिळतो.

  1. ई-कॉमर्स (E-Commerce)

ई-कॉमर्स (इलेक्ट्रॉनिक कॉमर्स) ऑनलाइन सेवांचा किंवा इंटरनेटचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उत्पादने खरेदी करणे किंवा विकणे ही क्रिया आहे.


६. डेटा-चालित डिजिटल मार्केटिंग (Data-Driven Digital Marketing)

डिजिटल मार्केटींगद्वारे उत्पादनांच्या विक्रीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी चरण-दर-चरण (स्टेप-बाय स्टेप) केली जाणारी प्रक्रिया म्हणजे डेटा-चालित डिजिटल मार्केटिंग. ह्या प्रक्रियेत ५ चरण असतात ,

  1. संशोधन (Market Research)

पहिल्या चरणात पूर्ण मार्केट चे संशोधन करावे लागते. त्या मध्ये विक्रीचे उद्दीष्ट काय आहे, खरेदीदाराची वैयक्तिक (Buyer Persona) माहिती , मार्केटिंग करण्यासाठी लागणारी गुंतवुणकीची माहिती ह्या गोष्टी पहिल्या जातात.

  1. डिजिटल मार्केटिंग धोरण (Digital Marketing Strategy)

एकदा का मार्केट संशोधन पूर्ण झाले कि डिजिटल मार्केटिंग ची रूपरेषा आखली जाते. त्या धोरणात गुंतवणूकीतील परतावा (ROI – Return on investment) शोधण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची जरुरत आहे ते शोधले जाते. त्याच बरोबर पेड मीडिया वेळापत्रक तयार केले जाते. हे सर्व करण्यासाठी वेबसाइट ऑप्टिमिझशन, सोशल मीडिया , सर्च इंजिन ऑप्टिमिझशन चा विचार केला जातो.

  1. डिझाइन आणि उत्पादन (Design & Production)

एकदा का रूपरेषा अंतिम चरणात आली कि जाहिराती साठी लागणाऱ्या गोष्टी तयार केल्या जातात त्या मध्ये कॉण्टेण्ट क्रीशन – कॉण्टेण्ट मान्यता, पेड मार्केटिंग ची सेटअप तयार केले जातात.

  1. लाँच आणि कनेक्ट (Launch & Connect)

  1. वितरण आणि रूपांतरण (Delivery & Convert)

७. इंटरनेट वरून पैसे कसे कमवायचे (How Earn Money from Internet)

८. डिजिटल मार्केटिंग मधील करियरच्या संधी (Career opportunities in digital marketing)

हाच ब्लॉग ऑडिओ व व्हीडिओ स्वरूपात पाहण्या साठी खाली YouTube विडिओ ची लिंक दिली आहे. विडिओ जरूर पहा व विडिओ लाईक , शेयर करा.

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!