कोरोना आपल्याला काय शिकवून जाणार?
जेव्हा हा कोरोना जाईल तेव्हा सर्व प्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य म्हणजे काय असते ते खऱ्या अर्थाने समजणार. जवळपास २ ते ३ महिने स्वतःच्या च घरात असल्यावर सुद्धा बंदीवासात असल्याची भावना अनेकांना आली असेल ,या कठीण काळानंतर जेव्हा आपल्याला बाहेर पडण्याची मुभा मिळेल ,तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याची अनुभूती येईल.
- या लॉकडाऊन च्या काळात आपण घरात असल्याने निसर्ग ,पर्यावरण हळू हळू सुधारत आहे, कोरोणा गेल्यानंतर आपल्यातील बहुतेकांना आपली पर्यावरणाबाबत काही जबाबदारी आहे हे कळून येईल.
- स्वछता ठेवणं हि मनुष्याच्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
- आपले शेजारी आपण समजतो तेवढे वाईट नाहीत, हे अनेकांना कळून येईल. माणूस समाजशील प्राणी आहे याचा प्रत्यय येईल.
- अन्नाचं महत्त्व लक्षात येईल. शेतकऱ्याला पोशिंदा का म्हणतात हे लक्षात येईल ( संकटात वडील पाठीशी असले की जी हिम्मत आणि ताकद मिळते त्या च प्रकारे शेतकऱ्यांनी शहराला भाजीपाला, फळे वगेरे पुरवून आपल्या पाठीशी राहिले आहे.)
- एखादी वस्तू बिघडल्यावर आपण घरी च दुरुस्त करू शकतो किंवा त्या वस्तूच्या नसण्याने काही फरक पडत नाही या विश्वास येईल.
- पैसे जपून वापरण्याचा शहाणपणा येईल.
- आपल्याला सर्व भेटत असताना सुद्धा आपले हाल होत आहे तर ज्यांच्या कडे काही नाही त्याचं काय होत असेल असे विचार करून काहींची माणुसकी नक्कीच वाढेल.
- एकत्र राहून, एकत्र जेवण करून, कुटूंब किती सुखी होऊ शकतं हे कळलं
- संकट आल्यानंतर आपण जात ,धर्म विसरून जाऊन एकत्र होऊ शकतो हे कळून चुकेल ( अनेक मुस्लिमांनी अनेक हिंदूच्या पार्थिवाला त्यांचे सगेसोयरे नसतांना शेजारधर्म म्हणून खांदा दिलेला आहे)
- कमीत कमी गोष्टीत सुद्धा आपल भागू शकते हा विश्वास येईल.
- स्वछता ठेवणं हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
- मॉल, जंक फूड याशिवाय पण तरुण पिढी जगू शकते.
- भारत , आणि भारताच्या जुन्या रूढी, परंपरा जसे की नमस्कार, चप्पल घरा बाहेर, बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुणे किती चांगल्या आहेत हे कळले.
- कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटामुळे डॉक्टर आणि आरोग्य सुविधांचे महत्त्व काय आहे हे आपल्याला चांगलेच समजले आहे. आरोग्य सेवांवर खर्च करणे सर्वात महत्वाचे आहे.
- या कोरोनामुळे नक्कीच आपल्यातली माणुसकी 1% तरी वाढेल च.
- कोरोना संकटाने हे सिद्ध केले की या जगात निसर्ग सर्वोपरि आहे. माणूस फक्त विनाशकाच्या भूमिकेत असतो. त्याच्या जीवनशैलीत बदल घडवून त्याला नैसर्गिक निरीक्षक बनवण्याची नितांत आवश्यकता आहे.
तुम्हाला जर अजून काही मुद्दे सांगायचे असतील तर कंमेंट करून सांगू शकता .