संगणक (Computer) म्हणजे काय? | What is a computer in Marathi?

चला तर आज आपण संगणक म्हणजे काय जाणून घेऊया…संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. ‘Computer’ हा शब्द ‘compute’ ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे. ५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे .

( COMPUTER ) :
C : commonly
O : operated
M : machine
P : particularly
U : used
T : technical
E : educational
R : research

संगणक म्हणजे एक असे यंत्र आहे ज्याचा वापर करून आपण डेटावर (प्रक्रिया न केलेली माहिती) विविध सूचनांच्या आधारे प्रक्रिया करून माहिती (प्रक्रिया केलेल्या डेटा) मध्ये बदल करू शकतो. संगणकामध्ये माहिती प्रक्रिया करून घेण्यासाठी आपल्याला संगणकामध्ये काही डेटा भरण्याची आवश्यकता असते. हा डेटा भरण्यासाठी कीबोर्ड, माऊस यांसारखी इनपुट उपकरणे वापरतात.

संगणक

काम करण्याची पद्धत :-

संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.
१) इनपुट डिवाइस (Input Divice)
2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)
3) आउट पुट डिवाइस (Output Divice)

१)   मॉनिटर :
की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला “मॉनिटर” असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात .

की-बोर्ड (Keyboard) :
की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .

माउस (Mouse) :
की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात .

२)   सी .पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :-
सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयू हा एक संगणकामधील महत्त्वाचा भाग आहे. सीपीयू शिवाय मॉनिटर सुद्धा काम करू शकत नाही. मायक्रोप्रोसेसर हा सीपीयू चा अंतर्भाग आहे . मायक्रोप्रोसेसर हा संगणकाचा मेंदू समजला जातो. मायक्रोप्रोसेसरला मायक्रो सीपीयू चीप म्हणून सुद्धा ओळखले जाते. सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु . ला ही दोन भाग असतात .
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोल युनिट
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट :- हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे .याच्या नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली जाते , त्यावर प्रक्रिया होते . बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात . तसेच एखाद्या संख्येची तुलना देखील दोन संख्ये मधून काढले जातात .
ब) कंट्रोल यूनिट :- संगणकामध्ये होणार्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते .
इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .

३)  आउट पुट विभाग :-
इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते . म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात . उदा :- मॉनिटर , प्रिंटर

काही महत्वाचे भाग :

मदर बोर्ड (Motherboard)  :
मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को – प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट असतात. मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड .
मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले असते. मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे म्हणतात.
मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो.

मेमरी (Memory):
CPU म्हणजे प्रोसेसर नंतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते . या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते . १) रीड ओनली मेमरी (Read Only Memory) २) रंण्डम एक्सेस मेमरी (Random Access Memory).

हार्ड डिस्क (Hard Disk) :
हार्ड डिस्क संगणकाच्या CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर काढली जात नाही . हार्ड डिस्क पेटि प्रमाणे असते . याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क एकावर एक अशा रचलेल्या असतात . या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक डिस्कला रीड राइट हेड असतात .
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत . हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .
आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत . संगणका मध्ये जी माहित साठवली जाते ती म्हणजे हार्ड डिस्क मध्ये . हार्ड डिस्क हा एलेक्ट्रोनिस्क भाग आहे या मुळे तो कधी ही ख़राब होवू शकतो बिघडू शकतो . म्हणुन हार्ड डिस्क वरील डाटा ची माहिती दुसया हार्ड डिस्क वर अथवा CD वर Backup म्हणुन घेतली जावू शकते . शिवाय डाटा लॉस झाला तरी तो रिकोवर करता येतो .
आता बाजारात साटा हार्ड डिस्क आल्या आहेत ह्या नोर्मल हार्ड डिस्क पेक्षा जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात आणि त्यांची डाटा साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे 300Gb पेक्षा जास्त क्षमता असणारी हार्ड डिस्क अतिशय अल्प दरात मिळते.


संगणकाचे प्रकार :-

संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप
संगणकाचे तिन प्रकार आहेत
१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हाइब्रिड कॉम्प्युटर

डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .


सुपर कोंम्प्यूटर :-
हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .
मेनफ्रेम संगणक :-
हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा सग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी

संगणकाची वैशिष्ट्ये आणि मूलभूत उपयोग :

१. गणित आणि भौतिक शास्त्रातील मोठी उदाहरणे सहजतेने सोडवू शकतो .

२. संगणकाच्या वापरामुळे व्यवसाय, शासकीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र, समाजशास्त्र, वैद्यकीय क्षेत्र, कायदा, संशोधन क्षेत्र इतकेच काय तर संगीत आणि कला ही क्षेत्रे देखील प्रभावित झालेली आहेत.

ऑपरेटिंग सिस्टम (OS) :

संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .
ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन2000, विनXP, विन विस्टा,विन 7 ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .

विन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :

1. प्रोसेसर :- कमीतकमी P-1 , 233MHZ , Ram :- 128 MB कमीत कमी 64MB ,

2. हार्ड डिस्क :- 1.5 GB , ड्राइव :- Cd रोम

3. मॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस

संगणकाचा इतिहास :

आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाटयाचा उपयोग करतात . प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत ” अबँकस ” (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या यंत्राला सुचानाचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते . १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रनालित कोणते ही काम वेगात पार पड़ता येवू लागले . त्यानीच पुढे आईबीएम कंपनी ( इंटरनेशनल बिज़नेस मशीन ) सुरु केली . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते . १९४७ साली भोतिक्शास्त्रत क्रांति होवून ट्रान्झीस्टर शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे . तेच आजचे संगणक आहे .संगणक फ़क्त १ किवा 0हेच अंक समजू शकतो .म्हणुन खालील प्रमाने कंप्यूटरचा डाटा मोजला जातो.

Bit -Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits

Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits

Megabyte (MB) 1,024 Kilobytes

Gigabyte (GB) 1,024 Megabytes

Terabyte (TB) 1,024 Gigabytes

Petabyte (PB) 1,024 Terabytes

हार्डवेअर(hardware), सॉफ्टवेअर(software) म्हणजे काय?

हार्डवेअर (Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा . मॉनिटर , की-बोर्ड , हार्ड डिस्क , मदर बोर्ड , कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि.
सॉफ्टवेअर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेअर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेअर मुळेंच होतो.

इंटरनेट (Internet) :
१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब . Internet म्हणजेच महाजाल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेट. संगणकाला इंटरनेटची खूप गरज आहे. संगणकाच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान करण्याचे साधन म्हणजेच इंटरनेट. Internet  हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्‌चे चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे.
इंटरनेटवरून आपला व्यवसाय अतिशय वेगाने विकसित करू शकतात. बरेच व्यापारी ऑनलाईन त्यांची उत्पादने ऑनलाइन विकतात. विद्यार्थी त्यांना आवश्यक शैक्षणिक माहिती मिळवू शकता आम्ही नोकरींसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. आम्ही इंटरनेटद्वारे प्रतिमा आणि व्हिडिओ सामायिक करू शकतो.

संगणकाचे नेटवर्क :

दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.
नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .
१) लोकल एरिया नेटवर्क (LAN) :-
एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते .

२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-
हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .

3) वाइड एरिया नेटवर्क (WAN) :- जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात

संगणकाच्या नेटवर्कमुळे आपल्याला खालील प्रमाणे फायदे होतात.

१) शेअरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.

2) शेअरिंग ऑफ़ डीव्हाईस:- एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर

३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .
प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .

नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .

अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!