चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान कसे कार्य करते?
चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान हे एआय (आर्टिफिशल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत आहे. प्रचंड मोठा डाटाबेस (माहितीचा साठा) वापरून, चेहरा ओळखण्यासाठीचा एक विशेष अल्गोरिदम (सूत्र) तयार केले जाते, ज्याच्या मदतीने हे तंत्रज्ञान चेहरा ओळखते. चेहर्या वरचे हावभाव, काही जन्मखूणा, चेहर्याची ठेवण ह्यात पूरक मदत करतात. चेहरा ज्या सहा मुख्य भावना दर्शवतो, जसे की आनंद, दु:ख, भीती, क्रोध, घृणा आणि आश्चर्य ह्यांची मदत घेत हे तंत्रज्ञान कॅमेर्याच्या मदतीने आलेल्या चेहर्याच्या चित्राची तपासणी करते आणि पुरवण्यात आलेल्या डाटाबेसमधून त्या चेहर्याशी मिळता जुळता चेहरा शोधून काढते.