ब्राउझरवरुन युट्युबवरील एखादा व्हिडीओ डाऊनलोड कसा करुन घ्यावा?
तुम्हाला कुठलाही युट्युब व्हीडिओ जर डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी एखादं अप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची अजिबात गरज नाहीये. कुठल्याही ब्राउझरवरून तुम्ही अगदी सहज युट्युब व्हीडिओ डाउनलोड करून तुमच्या गॅलरीमध्ये साठवू शकता तेही हव्या त्या क्वालिटीमध्ये म्हणजे 240, 360, 480,720px या मध्ये. त्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा.
- युट्युबवर जा आणि जो व्हीडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक कॉपी करा.
- ब्राउझर उघडून त्यात y2mate youtube video download हे सर्च करा. आणि y2mateची वेबसाईट ओपन करा.
- इथे तुम्हाला तुमच्या व्हीडिओची लिंक पेस्ट करावी लागेल. आणि, त्यानंतर तो व्हीडिओ लोड होऊन कुठल्या क्वालिटी मध्ये तुम्हाला हवा आहे ते निवडावं लागेल. बस्स झालं इतकंच आणि व्हीडिओ डाऊनलोड!
दुसरा पर्याय,
- तुमचा युट्युब व्हीडिओ युट्युब ऍप्लिकेशन मधून न ओपन करता ब्राउझरमधून ओपन करा. (क्रोम,युसी किंवा ऑपेरा)
- जी लिंक त्यावेळेस कार्यरत असेल त्यात युट्युब डॉट कॉम च्या आधी दोन वेळा ss टाका आणि लोड करा. उदा. हि लिंक https://m.youtube.com/#*₹*@_& अशी व्हायला हवी -> https://m.ssyoutube.com/#*₹*@_&
- तुमचा व्हीडिओ कुठल्या क्वालिटी मध्ये हवा आहे हे विचारलं जाईल ते सिलेक्ट करा आणि डाऊनलोड करा!
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/