भविष्यात लवकरच वापरात येतील असे काही तंत्रज्ञान कोणते आहेत?
इथून पुढे सगळ्या गोष्टी ‘वायरलेस’ असणार आहेत आणि तेच माझं काम आहे. म्हणूनच हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.मी इथे तीनच तंत्रज्ञानाविषयी बोलणार आहे कारण त्यांनी आपल्या जीवनात आधीच मुंगीसारखा शिरकाव केला आहे आणि हळूहळू त्यांचं प्रस्थ वाढत जाणार आहे.
५ जी: ह्या तंत्रज्ञानावर काम २०१२ पासून सुरु आहे. आज आपण ४जीमध्ये इंटरनेट स्पीड १ Mbps पर्यंत वापरतो. ५जी मध्ये हा स्पीड काही GB पर्यंत जातो. आम्ही टेस्ट केलेलं डिजाईन ४ Gbps पर्यंत स्पीड देत होतं. येणाऱ्या ४-५ वर्षात आपल्या घरात खूप वेगात चालणारं इंटरनेट असणार आहे.

एआर: (ऑगमेंटेड रिऍलिटी): ह्या तंत्रज्ञानाचा वापर नुसता गेम खेळण्यापुरता मर्यादित नाहीये, तर मशीन रिपेअर पासून , शस्त्रक्रिया आणि इंटिरियर डिजाईन पर्यंत सगळीकडे ह्याचा वापर होतो आहे.

ए.आय. (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स): हॉलीवूड चित्रपटांमध्ये दाखवतात तसं रोबॉटनी माणसांवर अधिराज्य गाजवायची दिवस अजून दूर आहेत. परंतु, जेव्हा तुम्ही फोन मध्ये गूगल फिट इन्स्टॉल करता, किंवा ‘स्मार्टबॅन्ड/स्मार्टवॉच’ वापरता तेव्हा ए. आय. तुमच्या सोबत काम करत असते. नुसत्या आवाजाने (ए कोण आहे रे तिकडेच्या अविर्भावात) आपण गूगल होम आणि अलेक्सा वापरून लाईट, पंखे, TV आणि बरंच काही नियंत्रित करू शकतो (मी करतो). फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्या घरासाठी तसं एक सॉफ्टवेअर बनवलं आहे; ते त्याने स्वतः केलं आहे. पण येणाऱ्या ३-४ वर्षात आपल संपूर्ण घर आपल्या आवाजाने नियंत्रित होईल.
