भारत देशामध्ये शिक्षणाचा दर्जा कसा आहे?

सर्वात महत्त्वाचे, आपली शिक्षण पद्धती शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?

जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोण? ते कोणत्या देशाचे आहेत? आणि यात भारतीय किती ?

असे प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर त्याचे उत्तर नुकतेच Clarivate Analytics या माहितीच्या विश्लेषणाच्या शेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने दिले आहे.

सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पाहिल्या दहा देशामध्ये म्हणजेच टॉप टेन मध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका मग ब्रिटन, चीन, जर्मनी , ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, कॅनडा, फ्रान्स, स्विझर्लांड आणि स्पेन आहे.

आपल्या मनात विचार आला असेल की भारत का नाही या यादीत?

कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तरी त्या देशाचे लागतात. जसे अमेरिकेचे २६३९ शास्त्रज्ञांचा या यादीत स्थान मिळाले आहे, ब्रिटनचे ५४६, चीनचे ४८२ शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि भारताचे फक्त दहा शास्त्रज्ञांचा या यादीत समावेश आहे. म्हणजे किमान शंभर शास्त्रज्ञांची तरी यादी हवी आणि त्याच्या जवळपास पण आपण भारतीय नाही आहोत.

मागील वर्षी नारायण मूर्ती यांनी एक विधान केले होते,

गेल्या साठ वर्षात आपण असा एक तरी असा शोध लावला आहे का की जेणेकरून जग बदलले आणि आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली

काय कारण असेल याचे? १२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शंभर शास्त्रज्ञांचे नाव सुद्धा आपल्याला देता येत नाही याचे मूळ कारण शोधले तर आपली शिक्षण पद्धती.

लॉर्ड मेकॉले पासून चालत आलेली आपली शिक्षण पद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते.

आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतो. आपल्या सर्वांना आयत्याउत्तराची सवय झाली आहे आणि जी शिक्षण पद्धती ही उत्तरांवर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही.

शिक्षणपद्धती ही प्रश्नांवर आधारित हवी. विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये तसे वातावरण हवे. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करावा लागतो.

शास्त्र विषय शाळेत महाविद्यालयामध्ये शिकवणे वेगळे आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणे वेगळे. त्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासा, कुतूहल याला भरपूर वाव हवा. शिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचार हवे, कारण अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर एक प्रक्रिया आहे.

तिचा देव धर्माशी संबंध नसतो. अंधश्रद्धा म्हणजे शब्दप्रामाण्य. अमुक अमुक सांगतो म्हणून ते खरंच असलं पाहिजे. त्याचे शब्द हेच प्रमाण. असे आपण घराघरातून, शाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतो. इथूनच त्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळूहळू त्याला किंवा तिला प्रश्नच पडत नाही.

जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होत नाही.

जर पुढील काही वर्षात भारतीय शास्त्रज्ञांची यादी १० वरून १०० वर न्यायची असेल तर आज शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजे. शाळेमध्ये असे काही वातावरण निर्माण करावे लागेल की विद्यार्थी सातत्याने हात आणि मेंदू याचा वापर करतील. अर्थात कृतिशील उपक्रम मुलांना करायला मिळाला हवे. त्यातून त्यांना असंख्य प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा ते स्वतःच शोधतील.

आपण सर्वांनी त्याच्या अवतीभवती जिज्ञासा, कुतूहल आणि प्रश्न निर्माण होतील असे इकॉ सिस्टीम म्हणजेच वातावरण निर्माण करायचे आहे.

ज्या वेळेस अल्बर्ट आईनस्टाईन हे ५ वर्षाचे होते , तेव्हा ते खुप आजारी पडले होते , त्यांना एक भेटवस्तू म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना एक यंत्र दिले होते , जे चुंबकीय दिशादर्शक (कपास) हे होत.

त्यांना त्याबद्दल खूप कुतूहल होते की ते काम कसं करते , अस म्हणतात की हाच त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट होता !

जसं वरील चित्रात तुम्ही पाहू शकतात , सर्वांना परीक्षा ही बंधनकारक असलीच पाहिजे परंतु , तुम्ही माशाला झाडावर चढायला नाही लावू शकत, त्यामुळे माशाला 🐟 आयुष्या भर असच वाटेल की मी मूर्ख आहे किंवा मी लायक नाही. कारण प्रत्येकजण हा हुशार असतो फक्त त्याला ते दाखऊन देता आलं पाहिजे की त्यामध्ये कोणती अशी गोष्ट आहे ती त्याला इतरांपेक्षा अधिक सक्षम बनवते ! 

पहिले ही इकॉसिस्टीम घरातून शाळेत, शाळेतून महाविद्यालयात, महाविद्यालय ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवे.

चला आजपासून शिक्षणात सृजनशीलतेला वाव देऊ. लहान मुलांच्या प्रत्येक निरर्थक प्रश्नांची उत्तरे देऊ कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की ,

महत्वपूर्ण बात यह है कि हम प्रश्न करना ना छोडें. जिज्ञासा के मौजूद होने के अपने खुद के कारण हैं ! – Albert Einstein

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!