असे कोणते मराठी शब्द आहेत जे इंग्रजीमध्ये देखील मराठीप्रमाणेच उच्चारले जातात?
मराठी इंग्रजी शब्द – समान ऊच्चार पण भिन्न अर्थ :
( या शब्दांच्या जोड्या एकमेकांचे देवनागरी x रोमन असे लिप्यंतरण transcription समजु नये. ते स्वतंत्र शब्द आहेत. )
- आय eye , माय my , बाय bye, हाय hi /high
- बोट boat, च्याट chat, गोट goat , मोट moat,
- बोर bore, विष wish , विट/ वीट wit , ईट eat ,
- पिक pick , बस bus , पी pee, नीट neat ,
- मेलो mellow , रोड road, किलबिल kill Bill,
- गाल gall , मीन mean , टिप tip , काऊ cow, गाय Guy,
- बाऊ bow, कोट coat, हेल hail / he’ll , बेल bell/bail ,
- बाइल bile , वेल well , रण run , गट gut, वार war,
- जार jar, मनी / मणी money , मोल mole, दाम dam ,
- किटण kitten, हेल hell, मोर more , मल mull , मटर mutter,
- वाईट white, जस्त just, पाल pal, पाय pie, डबड dubbed ,
- रोट rote, रोग rogue, रोज rose, नीट Neat, गोल Goal,
- मोल Mole, टीप Tip, ग्रास Grass, पंच Punch,
- कोण Cone, रोज Rose, गण Gun, सण Sun,
- सुन Soon, लूट Loot, सूट Suit
मराठी व इंग्रजी या वेगळ्या भाषा असुन ही काही शब्दांचे ऊच्चार एवढे समान आहेत की ऐकणाराचा “हा तर आपलाच मराठी शब्द आहे” असा गोंधळ होऊ शकतो. त्यांचे वेगळे असलेले अर्थ ऊमजल्यावर एक तर आपण हसायला लागतो किंवा थक्क होऊन जातो ! काही शब्दांच्या ऊच्चारा विषयी आपले दुमत होऊ शकते पण साम्य नाकारून चालणार नाही. हवामान, भुगोल, परंपरा, व्युत्पत्ती इ. मुळे तंतोतंत ऊच्चार साम्याची अपेक्षा करता येणार नाही.
एवढे लक्षात ठेवल्यास आपली भली करमणुक होणार हे निश्चित आहे. मी दिलेल्या समान मराठी शब्दांचे अर्थ काही आपल्या बोली भाषेतील आहेत तर काही नागर व प्रमाण भाषेतील आहेत. म्हणुन ऊच्चार किंचीत वेगळे ही वाटतील पण दिलेल्या प्रत्येक मराठी शब्दांच्या सार्थक असण्या विषयी मी ठाम आहे. शंका असल्यास मराठी इंग्रजी शब्दकोशात पडताळुन पहावेे. आपणास जर काही नवे शब्द सापडले तर इथे अवश्य वाटुन टाका !
संपादन >१ : या अशाच शब्दात आणखी भर टाकीत आहे :
वर उत्तरात इंग्रजी शब्दांच्या उच्चारात साम्य असलेले अस्सल मराठी शब्द दिलेले त्या सर्वांचा अर्थ आपणास कळला असे दिसतेय . आनंदाची गोष्ट आहे ! मुद्दाम मराठी अर्थ इथे दिलेत !
- Net नेट > (नेट लावणे = आग्रह करणे, बळ लावणे), Zeal झिल (मालवणी मुलगा)
- Case केस = ( माणुस/प्राणी यांच्या अंगावर येणारे बाल-केस ), Kid कीड (कीड़ा लागणे ,सड़न)
- Base बेस (लई चांगले ), Bet बेट (पाण्यातला भूभाग) ,Share शेर = (वजन माप )
**आपण ही टिप्पणीत कंमेंट करून आणखीन अशा शब्दांची भर टाकावी .