आपला देश राफेल विमानाची नमुनेदार निर्मिती का करू शकत नाही?

आपला देश राफेल विमानाची नमुनेदार निर्मिती का करू शकत नाही? राफेल विमान, हे आपण भारतीय बनावटीचे, तेजस हे LCA विमान बनविले, त्या पेक्षा किती तरी पटीने आगाऊ तंत्रज्ञान वापरून बनविलेले आहे, याबद्दल कोणाला शंका नको. राफेल विमानाचे काही तांत्रिक वैशिष्ट्य माहीत असले तर, हे विमान बनवायला कशा प्रकारचे तांत्रिक कौशल्य लागेल, हे समजने सोयीस्कर होईल.

राफेल विमानाचे तांत्रिक वैशिष्ट्य व युद्ध तत्परता खालील प्रमाणे आहेत.

  • विमानाची लांबी : 15.27 मीटर,
  • विमानाचा स्पॅन ( मुख्य पंख रुंदी) : 10.80 मीटर,
  • पंख :-कॅनर्ड टाइप डेल्टा विंग
  • इंजिन :- SNECMA M 88 डबल इंजिन.
  • उंची :- 5.30 मीटर,
  • वजन बिना सामुग्री : 10000 किलो
  • वजन सर्व सामुग्री :- 24500 किलो
  • इंधन :- 6700 किलो ( बाहेरील टॅंक सह),
  • वेग :- तासी 2222.6 की.मी./ 1.8 मॅक
  • उड्डाण उंची :- 50000 फूट,
  • एक वेळेस अंतर : 3700 की.मी. ( हवेत इंधन भरण्याची सोय),
  • बॉम्ब नेण्याची क्षमता :- 9500 किलो.
  • मिसाईल :- मिका लॉंग रेंज हवेतून हवेत / हवेतून जमिनीवर मारा
  • नेक्सस्टर 30M कॅनन :- 2500 गोळ्या प्रति मिनिटास,

अशी थोडक्यात माहिती आहे.

आता LCA तेजस विमान बनवितांना HAL ला काय काय अडचणीतुन जावे लागले, त्यामुळे संशोधन व बनावट यांचा खर्च कसा वाढत गेला, हे आपल्याला खालील मुद्यांवरुन लक्षात येईल.

1980 साली तेजस (an Indian single-engine, delta wingmultirolelight fighter) हे लढाऊ विमान भारतीय वायु दल व भारतीय नौसेना यांच्या वापरा करिता बनविण्याचा प्रकल्प हिंदुस्थान एरोनॉटिकस लिमिटेड, बंगळुरू येथे सुरू झाला.

या विमानाला भारतीय बनावटीचे इंजिन लावयाचे असा निर्णय सरंक्षण मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार गॅस अँड टरबाईन रिसर्च इस्त्याबलिशमेन्ट(GTRE) ला हे काम देण्यात आले. याची जबाबदारी DRDO कडे सोपविण्यात आली होती.

या विमानासाठी कावेरी हे इंजिन बनविण्याचे काम एक वेगळा प्रकल्प म्हणुन सुरु करण्यात आले. हे काम अंत्यत उच्च तंत्रज्ञान व संशोधनाचे व खर्चिक होते.

संशोधनावरती अमाप खर्च होऊन पण यश कितपत मिळते हे भाकीत करता येत नाही. DRDO च्या अधिपत्याखाली GTRE ने तेजस या LCA करिता “कावेरी” हे इंजिन एक नवीन प्रोजेक्ट म्हणुन विडा उचलला होता. हा प्रोजेक्ट 1986 च्या आसपास सुरू झाला होता. अगोदर च्या चाचणी मध्ये हाय स्पीड ला या इंजिनच्या टरबाईन ब्लेडचे तुकडे झाले होते. नंतर काही संशोधन करीत याची किंमत;

“एप्रिल 1989 मध्ये, एकुण 93 महिन्याच्या प्रकल्पासाठी अंदाजे किंमत रुपये 382 कोटी होती. विमान इंजिन बनविणाऱ्या अधिकृत कंपन्याच्या अंदाजानुसार ही किंमत फक्त रुपये 200 कोटी इतकी होती”

in April 1989 in what was then expected to be a 93-month program projected to cost ₹3.82 billion (US$53.6 million). A new engine typically costs up to $2 billion to develop, according to engine industry executives.

तरी 2004 मध्ये रशियात High Altitude test, घेण्यात आली, ते निकाल पण निराशाजनक ठरले, व कावेरी इंजिनाचा तेजस विमानात वापर करण्याच्या आशा पण संपल्या.

In mid-2004, the Kaveri failed its high-altitude tests in Russia, ending the last hopes of introducing it with the first production Tejas aircraft.

“या दुर्दैवी घटनांमुळे संरक्षण मंत्रालयाला 2005 साली 40 अमेरिकन IN20 इंजिनाची 20 विमानाकरिता मागणी करावी लागली, तसेच आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाची मदत व त्यासाठी SNECMA या कंपनी बरोबर कावेरी च्या तांत्रिक अडचणी सोडविणासाठी करार करावा लागला”

This unfortunate development led the Indian Ministry of Defence (MoD) to order 40 more IN20 engines in 2005 for the first 20 production aircraft, and to openly appeal for international participation in completing development of the Kaveri. In February 2006, the ADA awarded a contract to SNECMA for technical assistance in working out the Kaveri’s problem

वरील दोन कारण वाचून आपल्याला समजेल की, संशोधन करून पण शेवटी तेजसला पण अमेरिकन F404-GE-IN20 हे इंजिन मागवावे लागले.

रशियन धातुशास्त्र इतके पुढारलेले आहे की, गजराज ( IL 76 ) या विमानात रणगाडे वाहून नेतात, पण फ्लोरिंग चे रिव्हट हेड पण घासत नाही, हा माझा वायुसेनेतील अनुभव आहे. “इंजिन बे” मधून जाणारे स्टील हायड्रोलिक व न्यूमॅटिक पाईप जर काही कामासाठी काढले तर self Sealing Coupling जोडणे, म्हणजे Highly Skilled Job.

आता आपण राफेलचे तंत्रज्ञान किती अद्ययावत आहे, हे समजून घेतले असणार. याची दररोजची देखभाल करण्यासाठी भारतीय वायुसेनेचे अभियंते व तंत्रज्ञ यांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच जेव्हा मेजर सर्व्हिस ची वेळ येईल तो पर्यंत HAL चे व रिलायन्सचे अभियंते व तन्द्रज्ञ पण प्रशिक्षण घेऊन येतील.

जेव्हा निर्मिती व उत्पादनाचा प्रश्न येईल, तेव्हा ती तुमच्यात नक्कल करण्याची क्षमता असले तरच शक्य होईल. त्यासाठी पुन्हा ज्या अडचणी, संशोधन व उत्पादन करतांना तेजस ला आल्या व शेवटी आंतरराष्ट्रीय मदत घेऊनच तेजसचे उड्डाण यशस्वी झाले. राफेलच्या बाबतीत पण संशोधन खर्च व उत्पादनासाठी लागणारे वर्ष याची सांगड घालणे, आज तरी सरंक्षण मंत्रालयाला शक्य नाही . या सर्व घटकामुळे आज तरी राफेल भारतात बनविणे शक्य नाही.

स्रोत :-

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!